S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरसाठी वापरली शेतकऱ्याची शेती, अडीच महिन्यानंतरही हेलिपॅड जैसे थेच!
  • VIDEO :मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरसाठी वापरली शेतकऱ्याची शेती, अडीच महिन्यानंतरही हेलिपॅड जैसे थेच!

    Published On: Feb 23, 2019 05:03 PM IST | Updated On: Feb 23, 2019 05:13 PM IST

    23 फेब्रुवारी : बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथं 3 डिसेंबर 2018 ला नगारा भूमीपूजनच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी पोहरादेवीचे शेतकरी भाऊराव घुगे यांच्या 5 एकर शेतात हेलिपॅड बनवण्यात आलं होतं. ते बनवताना घुगे यांना शेत पूर्ववत करून देऊ तसंच काही नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं होतं. पण, आज तब्बल अडीच महिन्यानंतरही हे हेलिपॅड आहे तसंच आहे. त्यांनी रब्बी पीकाचं आणि पाईपलाईनचं नुकसान करुन जागा उपलब्ध करुन दिली, पण प्रशासनानं त्यांचं शेत पूर्ववत केलं नाही आहे. त्यांनी प्रशासनाकडे तीन वेळा पत्रव्यवहार केला. परंतु, त्याची दखल कुणीही घेतली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close