मुंबई, 27 जून - ''उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि नोकऱ्यांमध्ये 13 टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालानंतरच उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला निर्णय जाहीर केला'', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. ''वास्तविक पाहता 16 टक्के आरक्षणाची मागणी होती, पण 13 टक्के जाहीर करण्यात आलेल्या या आरक्षणामुळे कुणीही नाराज न होता त्याचा स्वीकार करावा'', असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता उच्चन्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण ही आनंदाची बाब असल्याचं ते यावेळी म्हणाले.