S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : औरंगाबादेत सिटीबसने तरुणाला उडवलं, आयसीयूमध्ये केलं दाखल
  • VIDEO : औरंगाबादेत सिटीबसने तरुणाला उडवलं, आयसीयूमध्ये केलं दाखल

    Published On: Feb 11, 2019 06:42 PM IST | Updated On: Feb 11, 2019 06:42 PM IST

    11 फेब्रुवारी : औरंगाबाद शहरात 23 जानेवारीला मोठ्या थाटात सिटीबसचा शुभारंभ करण्यात आला. अजून सिटीबस शहरात रुळली नाही; तोच आज सव्वा अकरा वाजता सिडको चौकात एका पदचाऱ्याला उडवलं. हा अपघाताची भीषण होता की, अपघातात उडवलेला युवक दहा ते पंधरा फूट लांब जावून पडला. त्याला तातडीने नजीकच असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. परंतु, त्यांनी त्या युवकाला तपासून शासकीय रुग्णालयामध्ये तातडीने हलवण्यास सांगितलं. घाटीमध्ये दाखल केल्यानंतर तेथील डॉक्‍टरांनी अपघात विभागात प्राथमिक उपचार केले आहेत. रक्त जास्त गेल्यानं त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून तरुणाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्‍टरांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close