• VIDEO : तुला ना मला घाल कुत्र्याला...

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2018 10:30 PM IST | Updated On: Jul 16, 2018 10:30 PM IST

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंदला सकारात्मक प्रतिसाद देत कोथळी शेतकऱ्यांनी आपले दूध कुत्र्यांना पाजत अभिनवं पद्धतीने शासनाच्या दूध धोरणाचा निषेध केला. येथील अनेक शेतकऱ्यांनी आणि बेरोजगार युवकांनी दूध व्यवसाय स्वीकारत त्यामध्ये चांगला जम बसवला आहे मात्र मागील काही महिन्यांपासून सातत्याने कमी होणाऱ्या दुधाच्या भावाने हा व्यवसाय त्यांना परवडत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. यासाठी दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान मिळावे आणि अनुदानाची रक्कम दूध संघांना न देता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासाठी राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध बंद आंदोलन छेडण्यात आले आहे. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद या ठिकाणी देण्यात आला. शासनाचा निषेध म्हणून येथील शेतकऱ्यांनी आपले दूध कुत्र्यांना पाजले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading