14 मार्च : सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशावरुन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कलगीतुरा सुरूच आहे. 'विखे पाटलांबद्दल मी एक सामान्य कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून मत मांडलं होतं', अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. तसंच, 'मी अपक्ष निवडणूक लढवली पण माझी पक्षनिष्ठा सर्वांना माहिती आहे, त्यांची पक्षनिष्ठाही सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणत थोरातांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला.