01 मार्च : दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास वाघा सीमेवरून भारतात प्रवेश केला. हवाई दलाचे अधिकारी त्याला घ्यायला सीमेवर गेले होते. युद्ध कैदी जेव्हा मायदेशी परत येतो तेव्हा त्याला स्वीकारण्याचे लष्कराचे काही नियम असतात त्याचं पालन करत अभिनंदनचं स्वागत करण्यात आलं. 60 तासानंतर अभिनंदन भारतात परतला.