Elec-widget
  • VIDEO : विहिरीत होती तब्बल 7 फुटाची मगर!

    News18 Lokmat | Published On: Jan 7, 2019 10:26 PM IST | Updated On: Jan 7, 2019 10:38 PM IST

    स्वप्निल घाग, 07 जानेवारी : चिपळूणमधील खांदाटपाली गावातल्या गवळवाडी इथं नदीलगतच्या विहिरीमध्ये अडकलेल्या मगरीला चिपळूणचे वनरक्षक रामदास खोत आणि दत्ताराम सुर्वे यांनी सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. तब्बल 7 फूट लांबीची ही मादी मगर होती. मगर विहिरीमध्ये असलेची माहिती गावातल्याच सागर महाडीक आणि स्वप्निल खेडेकर यांनी वनविभागास दिली होती. ग्रामस्थांचे म्हणण्यानुसार, 'ही मगर 2005 साली आलेल्या पुरामुळे विहिरीमध्ये आली होती. सध्या विहिरीतील पाणी आटल्यामुळे ही मगर निदर्शनास आली.' मगरीस वेळेत बाहेर काढून जिवदान दिल्याबद्दल वनविभागाचे ग्रामस्थानी आभार व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com