• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : एका चेंडूत हव्या होत्या 6 धावा, तरीही 1 चेंडू राखून जिंकला सामना
  • VIDEO : एका चेंडूत हव्या होत्या 6 धावा, तरीही 1 चेंडू राखून जिंकला सामना

    News18 Lokmat | Published On: Jan 10, 2019 06:58 PM IST | Updated On: Jan 10, 2019 07:05 PM IST

    प्रदीप भणगे,10 जानेवारी : क्रिकेटच्या मैदानावर कधी काय घडू शकतं याचा नेम नाही. काही खेळाडू धावा करून तर काही जण गडी बाद करून विक्रम करतात. पण, डोंबिवलीतील एका स्थानिक सामन्यात एका खेळाडूने भलताच विक्रम केला आहे. डोंबिवलीमध्ये आदर्श क्रिकेट क्लब टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. यात देसाई आणि जुनी डोंबिवली असा सामना झाला होता. देसाई संघाने 76 धावांचे आव्हान दिले होते. अटीतटीच्या या सामन्यात जुनी डोंबिवली संघाला 1 बॉल मध्ये 6 रन हव्या होत्या. तरीही 1 चेंडू राखून विजय मिळवला. देसाई संघाच्या गोलंदाजाने अखेरच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर तब्बल 6 चेंडू वाईड टाकले आणि हाती आलेला सामना गमावला. (साभार -GTCLIVE-1)

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading