• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यातली भिंत पडली तेव्हा काय घडलं प्रत्यक्ष? CCTV फुटेज आलं समोर
  • VIDEO : पुण्यातली भिंत पडली तेव्हा काय घडलं प्रत्यक्ष? CCTV फुटेज आलं समोर

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 05:46 PM IST | Updated On: Jun 29, 2019 05:55 PM IST

    पुणे, 29 जून : कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली 'आल्कन स्टायलस' सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज न्यूज18 लोकमतच्या हाती लागलं आहे. आल्कन स्टायलस सोसायटीच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्यांच्या खोल्यावर रात्री दोनच्या सुमारास आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असल्याने खालच्या बाजूला असलेल्या खोल्यांवर भिंतीचा ढिगारा पडला. त्याखाली दबून 15 कामगारांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी