• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : या गावातील लोकांसाठी हे झाड ठरलंय 'नेटवर्क-ट्री'
  • VIDEO : या गावातील लोकांसाठी हे झाड ठरलंय 'नेटवर्क-ट्री'

    News18 Lokmat | Published On: Dec 27, 2018 08:27 PM IST | Updated On: Dec 27, 2018 08:27 PM IST

    उस्मानाबाद, 27 डिसेंबर : सरकार डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असले तरी भूम तालुक्यातील डोंगर कुशीत वसलेली हंडोग्री, हिवरा, दिंडोरी ही तीन गावे मोबाईलची रेंज मिळत नसल्याने विकासापासून वंचित आहेत. मोबाईल आहेत, मात्र त्यात नेटवर्करुपी आत्माच नसल्याने या तिन्ही गावांतील लोकांना नेटवर्क मिळविण्यासाठी झाडावर चढावं लागतं. भूमलगतच्या गावकऱ्यांसाठी हे झाड 'नेटवर्क-ट्री' ठरलं आहे. कारण नेटवर्कच्या एका कांडीसाठी हंडोग्री, हिवरा आणि दिंडोरी या गावातल्या रहिवाशांना याच झाडावर चढावं लागतं. सातबारा असो वा इतर महत्त्वाची सगळी सरकारी कागदपत्रे ऑनलाईन देण्याची सोय सरकारनं करून ठेवली आहे. मात्र, नेटवर्कच नसल्यामुळे या तिन्ही गावांतील ऑनलाईन सेवांचा पुरता बोजवारा उडाला आहे. 'डिजिटल इंडिया'चा हा मुखडा जगासमोर आणला आहे न्यूज18 लोकमतचे उस्मानाबादचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading