• होम
  • व्हिडिओ
  • चक्क शाळेच्या कार्यक्रमात थिरकल्या बारबाला; VIDEO VIRAL
  • चक्क शाळेच्या कार्यक्रमात थिरकल्या बारबाला; VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Jan 6, 2019 08:11 AM IST | Updated On: Jan 6, 2019 08:11 AM IST

    बलिया, 5 जानेवारी : उत्तर प्रदेशातील बलिया येथील एका प्रथमिक शाळेत एका कार्यक्रमात चक्का बारबालांनी अश्लिल डान्स केला. ब्लँकेट वितरणासाठी म्हणून शांळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे, हा प्रकार सुरू असताना, शाळा भरलेली होती आणि विद्यार्थी वर्ग खोल्यांमध्ये अभ्यासमग्न होते. यावेळेस मोठ्या आवाजात सुरू असलेल्या गाण्यांमुळे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित झालं नसेल तरच नवल. यावेळेस कार्यक्रमाला उपस्थित पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यासह अनेक गणमान्य उपस्थित होते. हा प्रकारावर थांबवण्याएवजी त्यांनी सुद्धा बारबालांसोबत डान्स करून कार्यक्रमाचा आनंद लुटला. स्थानिक शिक्षणाधिकारी संतोषकुमार राय यांनी घडल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. कार्यक्रमातला हा VIDEO चांगलाच VIRAL झाल्यामुळे आयोजकामध्ये खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading