• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोबाईलचं कव्हर घेण्यासाठी हा पठ्ठा दुकानात शिरला, आणि...
  • VIDEO : मोबाईलचं कव्हर घेण्यासाठी हा पठ्ठा दुकानात शिरला, आणि...

    News18 Lokmat | Published On: Dec 2, 2018 11:39 PM IST | Updated On: Dec 2, 2018 11:44 PM IST

    उल्हासनगर, 2 डिसेंबर : मोबाईल चोरी करतांना हा चोरटा सिसिटीव्हीमध्ये कैद झाला आहे.उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात एक चोरटा मोबाईलचे कव्हर खरेदी करण्यासाठी आला होता. यावेळी मोबाईल कव्हर काढण्यासाठी म्हणून दुकानदाराची पाठ फिरताच, संधीचा फायदा घेत अवघ्या काही सेकंदात चोरट्याने मोबाईलच्या रॅकमधून नवीन मोबाईल चोरला.चोरट्याने त्याच्या शर्टात हा मोबाईल लपवत या दुकानातून पळ काढला. दरम्यान स्टॅक चेक करतांना एक मोबाईल कमी असल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासले गेले. तेव्हा एक ग्राहक आपल्या शर्टात मोबाईल लपवत असल्याचे त्याला दिसून आले. हा प्रकार समजताच मोबाईल विक्रेत्याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस मोबाईल चोराचा शोध घेत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी