• होम
  • व्हिडिओ
  • अडीच वर्षाच्या चिमुरडीचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके
  • अडीच वर्षाच्या चिमुरडीचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके

    News18 Lokmat | Published On: Sep 26, 2018 08:08 PM IST | Updated On: Sep 26, 2018 08:11 PM IST

    गणेश गायकवाड, 26 सप्टेंबर अडीच वर्षाच्या चिमुरडीवर जीवघेणा हल्ला करीत भटक्या कुत्र्याने तिचे अक्षरशः लचके तोडले. उल्हासनगर परीसरात ही धक्कादायक घटना घडली. धक्कादायक म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेने कुत्र्याच्या तावडीतून या चिमुरडीची सुटका केल्याने तिचा जीव वाचला. सध्या त्या चिमुकलीवर उल्हासनगर च्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रेमनगर टेकडीवर अडीच वर्षाची प्रांजली ही चिमुकली घरासमोर अंगणात खेळत होती. त्याच वेळेस एका भटक्या कुत्र्याने प्रांजलीवर अचानक हल्ल्ला करून तिच्या नाकाचा लचका तोडला. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेने प्रांजलीला कुत्र्याच्या तोंडातून सोडवले, या घटनेत प्रांजलीच्या नाकाला गंभीर दुखापत झालीये. शहरात पाच हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या असून उल्हासनगर महानगरपालिका या भटक्या कुत्र्यावर उपाय योजना करताना दिसत नाही. ही घटना घडल्यानंतर कल्याण महानगरपालिकेच्या पथकाला बोलावून तो कुत्रा पकडण्यात आला. आतापर्यंत या कुत्र्याने या भागात दोन तीन दिवसात पाच जणांना चावा घेतल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी