पुणे, 14 जानेवारी : नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याप्रकरणी उदयनराजे भोसले यांनी आज मौन सोडलंय. उदयनराजेंनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत याप्रकरणी नाराजी व्यक्त करत पुस्तक काढणाऱ्या लेखकाला चांगलंच फटकारून काढलं. शिवाजी महाराजांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. ती उंची कुणीही गाठू शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली. त्यानंतर उदयनराजेंनी आपला मोर्चा शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे वळवला.