S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शत्रुत्व विसरून जेव्हा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे साताऱ्यात भेटतात...
  • VIDEO : शत्रुत्व विसरून जेव्हा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे साताऱ्यात भेटतात...

    News18 Lokmat | Published On: Jan 2, 2019 06:36 PM IST | Updated On: Jan 2, 2019 07:56 PM IST

    सातारा, 2 जानेवारी : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील द्वंद्व उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र, साताऱ्यातील जावळी येथील एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी दोन्ही राजे एकत्र आले. एकत्र आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हसतमुखाने हस्तांदोलन करीत शाब्दिक चिमटे काढले. खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांचा खांदा दाबला असता, शिवेंद्रराजे यांनी मोठया मनाने त्यांना दाद देत ''माझा सारखा खांदा का दाबताय?'' असं विचारलं. त्यावर दिलखुलासपणे उदयनराजे भोसले यांनी ''फिटनेस बघत आहे'' असं उत्तर देत हसले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close