• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सोनाराला बोलण्यात गुंतवून 'त्या' दोघींनी केल्या 2 लाखांच्या बांगड्या लंपास
  • VIDEO : सोनाराला बोलण्यात गुंतवून 'त्या' दोघींनी केल्या 2 लाखांच्या बांगड्या लंपास

    News18 Lokmat | Published On: Dec 22, 2018 07:24 AM IST | Updated On: Dec 22, 2018 07:25 AM IST

    रतलाम, 21 डिसेंबर : मध्य प्रदेशातील रतलाम येथील एका सराफा दुकानात दोन महिलांनी दुकानदाराच्या डोळादेखत सोन्याच्या बांगड्या पळवल्या. चांदनी चौकातील 'सिद्धम ज्वेलर्स' मध्ये 19 डिसेंबर रोजी घडलेली ही घटना दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बांगड्या चोरी झाल्याचं तेव्हा लक्षात आलं जेव्हा दागिन्यांची मोजदाद करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजेस तपासण्यात आले, तेव्हा सराफा दुकानदार खडबडून जागा झाला. बांगड्यांचं वजन अंदाजे 60 ग्राम असून त्याची किम्मत 2 लाखांच्या जवळपास आहे. सीसीटीवी मध्ये स्पष्ट दिसतंय की, बांगड्या खरेदी करण्याच्या उद्देशाने आलेल्या तीन महिलांनी सोनाराला बोलण्यात गुंतवलं आणि पाहता-पाहता दोन बांगड्यांवर हात साफ केला. तक्रार दाखल करताच पोलिसांनी त्या महिलांचा शोध सुरू केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी