मुंबई, 6 डिसेंबर : दादर रेल्वे स्थानकावर गाडीतून उतरताना पडलेल्या दोन महिला जीआरपी जवानांच्या सर्तकतेमुळे थोडक्यात बचावल्या. 6 डिसेंबर रोची सकाळी 8.20 ते 8.25 च्या सुमारास घडलेली ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीचं दर्शन घेण्यासाठी या दोन महिला आल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की, चालत्या गाडीतून खाली उतरणाऱ्या महिलांपैकी एक महिला फलाटावर पडली. आणि त्याच दरम्यान खाली उतरण्याच्या प्रयत्नात असलेली दुसरी आणखी एक महिला खाली पडली. पण, त्या दोघींच दैव बलवत्तर म्हणावं लागेल. त्याचवेळेस फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसानं क्षणाचाही विलंब न त्यांना वाचवण्यासाठी झेप घेतली आणि त्यां दोघींचा जीव वाचवला. त्या जीआरपी जवानाच्या सर्तकतेमुळे दोघींचे प्राण वाचले असले तरी