• होम
  • व्हिडिओ
  • मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; पहा LIVE VIDEO
  • मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; पहा LIVE VIDEO

    ram deshpande | News18 Lokmat | Published On: Jan 7, 2019 07:02 PM IST | Updated On: Jan 7, 2019 07:09 PM IST

    मुंबई, 7 जानेवारी : मंत्रालयात सोमवारी पुन्हा एकदा आत्महत्येता प्रयत्न झाला. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तिचं नाव लक्ष्मण चव्हाण असून, तो प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. यापूर्वी देखील मंत्रालयात असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी म्हणून मंत्रालयात जाळ्या लावण्यात आल्या आहेत. लक्ष्मण चव्हाण या कार्यकर्त्याने मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारताच, तो या जाळीत अडकला आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. घडल्या प्रकारानंतर एका सुरक्षा रक्षकाने जेव्हा त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने आणखी धुमाकूळ घातला. मंत्रालयात जागोजागी लागलेल्या CCTV कॅमेऱ्यांत हा सर्व प्रकार कैद झाला आहे. लक्ष्मण चव्हाण याने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading