चंद्रपूर, 08 जून : चंद्रपूर जवळच असलेल्या लोहाराच्या जंगलात पट्टेदार वाघानं अस्वलाची शिकार केली असून, या शिकारीजवळचं त्यानं ठाण मांडलं आहे. एरव्ही, अस्वलाची शिकार करण्यास उत्सुक नसलेल्या वाघानं ही केलेली शिकार समोरासमोर भेट झाल्यानं केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अवाढव्य असलेला हा वाघ बघण्यासाठी लोकांनी गर्दी केल्यानं वनविभागाने हा मार्ग अडवून धरला आहे.