मेडिकल कॉलेजमधील Dance Video च्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO

मेडिकल कॉलेजमधील Dance Video च्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO

Medical College Dance Video: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) एक डान्स व्हिडीओ व्हायरल (Viral Dance Video) झाला होता. या व्हिडीओला काहींनी सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न केला. आता संबंधित विद्यार्थांनी त्याच गाण्यावर नवीन व्हिडीओ तयार टीकाकारांना चपराक लगावली आहे.

  • Share this:

थ्रिसूर, 12 एप्रिल: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) एक डान्स व्हिडीओ व्हायरल (Viral Dance Video) झाला होता. या व्हिडीओला अनेक लोकांनी मोठी पसंती दर्शवली होती. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याला सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर आता संबंधित विद्यार्थांनी त्याच गाण्यावर नवीन व्हिडीओ बनवून टीकाकारांना चपराक लगावली आहे. त्यांचा हा नवीन व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

संबंधित वादग्रस्त व्हिडीओ केरळमधील दोन मेडिकल स्टूडंटचा आहे. व्हिडीओमध्ये दोघंही 1978 मधील हीट रासपुतिन गाण्यावर डान्स करत आहेत. यातील एका विद्यार्थ्याचं नाव नवीन के रजाक तर विद्यार्थीनीचं नाव जानकी ओमकुमार असं आहे. दोघंही थ्रिसूर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघंही चर्चेत आले आहेत. दोघांनी हा व्हिडीओ कॉलेजच्या परिसरातच बनवला आहे.

हा डान्स व्हिडीओ सर्वात आधी 23 मार्चला इंटरनेटवर अपलोड झाला होता. हा व्हिडीओ लोकांच्या इतका पसंतीस उतरला की लोकांनी मोठ्या संख्येत तो शेअर केला आणि हजारो वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला. परंतु, मागील दोन दिवसात काही लोकांनी या व्हिडीओला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहिल्या गेलेल्या मुलाचं नाव नवीन के रजाक असं आहे. त्यामुळे अनेकांनी या दोघांवर टीका केली असून या व्हिडीओला लव्ह जिहादशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला.

त्यानंतर आता या वादाला थ्रिसूर मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओतूनच उत्तर दिलं आहे. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी त्याच गाण्यावर एकत्रितपणे नवीन डान्स व्हिडिओ तयार केला. या व्हिडीओतून त्यांनी 'आम्ही सर्वजण एक आहोत, असा संदेशच दिला आहेत. नवीन मुस्लिम आणि जानकी हिंदू म्हणून या व्हिडिओला सांप्रदायिक रंग (Communal view) देण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला होता. त्यामध्ये त्याने या व्हिडीओला लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचं म्हटलं होतं. पण संबंधित विद्यार्थ्यांनी त्याच गाण्यावर नवीन व्हिडीओ तयार करून संबंधित वकिलाला चपराक लगावली आहे.

हे ही वाचा- प्रचंड गाजलेला मेडिकल कॉलेजमधील Dance Video पुन्हा चर्चेत, का ठरतोय वादाचा मुद्दा?

कोविड-19 साथीच्या काळात फ्रंटलाइन वर्कर म्हणून देशभरातील डॉक्टर दिवसरात्र मेहनत करत आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतरही त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं आहे. अशा स्थितीत हा व्हिडीओ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आता दुसरा व्हिडीओही सोशल मीडियात वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 12, 2021, 1:12 PM IST

ताज्या बातम्या