• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पर्यटकांच्या गर्दीमुळे फुलले कोकण किनारे; महाबळेश्वर, माथेरानही हाऊस फुल्ल
  • VIDEO : पर्यटकांच्या गर्दीमुळे फुलले कोकण किनारे; महाबळेश्वर, माथेरानही हाऊस फुल्ल

    News18 Lokmat | Published On: Dec 30, 2018 11:13 PM IST | Updated On: Dec 30, 2018 11:22 PM IST

    नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यापासून कोकणापर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे. गेल्या काही वर्षात कोकणात नववर्ष साजरं करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असून, महाबळेश्वर आणि माथेरान या थंड हवेच्या ठिकणीही मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. मुंबईतही नववर्षाच्या स्वागतासाठीचा जल्लोष सुरू झालाय. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आता केवळ काही तास उरले आहेत. हे क्षण कायमचे आठवणीत रहावेत यासाठी पर्यटकांनी गोवा, कोकण आणि मुंबईतील निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावर गर्दी केली आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे हे सगळेच समुद्र किनारे फुलून गेले आहेत. थर्टी फस्ट निमित समुद्रकिनारी जमलेले हे पर्यटक ताज्या माशांचही अस्वाद घेताना दिसून येत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी