• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आॅर्डर..आॅर्डर..!,न्यायालयातून चोराने वकिलाची बॅग लांबवली
  • VIDEO : आॅर्डर..आॅर्डर..!,न्यायालयातून चोराने वकिलाची बॅग लांबवली

    News18 Lokmat | Published On: Oct 27, 2018 10:14 PM IST | Updated On: Oct 27, 2018 10:14 PM IST

    अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 27 आॅक्टोबर : ठाणे न्यायालयात चोरी झालीये..ज्या न्यायालयात न्यायदानाचे काम चालते...ज्या न्यायालयात अनेकांना न्याय मिळतो...ज्या न्यायालयात रोज हजारो लोकांचा वावर असतो अशा न्यायालयातच आता चोरीचा प्रकार घडलाय. ठाणे न्यायालयातील बार रुम नंबर २९ तळमजला या वकीलांच्या बार रुममध्ये सर्वांच्या समोर चोरीचा हा प्रकार घडलाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की, वकिलांच्या बार रुममध्ये एक पांढरा शर्ट घातलेला वृद्ध व्यक्ती फिरताना दिसतोय. तो २-३ वेळा बार रुममध्ये चकरा मारतो शेवटी ज्या ठिकाणी अगदी विश्वासाने आपली कागदपत्रे, बॅग आणि मौल्यवान वस्तू ठेवतात तेथे तो काही काळ घुटमळत राहतो आणि कोणाचं लक्ष नाहीये हे पाहून वकिलांच्या बार रुममधील एक बॅग घेऊन तो पोबारा करतो. ही बॅग ठाणे न्यायालयात प्रक्टीस करणारे वकील मनिषा चौधरी यांची होती. या बॅगेत त्यांचा महागडा मोबाईल, १ हजार ८०० रुपये, केस संदर्भातले कागदपत्रे आणि मुलाच्या मेडिकलची बिलं होती. सुरुवातीला मनिषा चौधरी यांना काही कळेच ना बॅग कुठे गेली. जेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेज चेक केले तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी