S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लोकल स्टेशनवर चोराची चोरी तरुणाच्या जीवावर बेतली
  • VIDEO : लोकल स्टेशनवर चोराची चोरी तरुणाच्या जीवावर बेतली

    Published On: Aug 30, 2018 06:52 PM IST | Updated On: Aug 30, 2018 06:52 PM IST

    मुंबई, 30 आॅगस्ट : मुंबईतला लोकल प्रवास कसा दिवसेंदिवस जीवघेणा बनतोय हे पुन्हा एकदा कळव्याच्या घटनेवरून दिसून आलंय. 19 ऑगस्टला एक तरूण मोबाईल घेऊन ट्रेनच्या दरवाज्यात उभा होता. त्यावेळी चोरट्याने त्याच्या हातवर जोरदार फटका मारला आणि मोबाईल खेचला. जसा मोबाईल खाली पडला तशी या तरुणाने चालत्या ट्रेनमधून उडी मारली आणि या तरुणाचा उडी मारल्याने जागीचं मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या आरोपीची शोध घेतला. आरोपी हा कळव्यातील झोपडपट्टीत राहत होता. अजय सोळंकी असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केलीय. काही दिवसांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकावर अशाच प्रकारे चालत्या रेल्वेतून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न एका चोरट्याने केला होता. यामध्येही तरूणी गंभीर जखमी झाली होती. तसाच काहीसा प्रकार कळवा रेल्वेस्थानकावरही घडलाय. मात्र दुर्दैवानं यावेळी तरुणाचा मृत्यू झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close