मुंबई, 31 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PM Releif Fund मध्ये मदत करण्याचं आवाहन केलं आहे. देश संकटात असल्याने कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ येत आहे. यातचं भरउन्हात रस्त्यावरुन चालणाऱ्या चिमुरड्याचा एक टिकटॉक व्हिडीओ (TikTok Video) व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला सध्या बाहेरील परिस्थितीत जाणीव होईल आणित्याला खायला मिळाल्याचा आनंदही होईल.
लॉकडाऊनदरम्यान रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने खाण्याचे आबाळ होत आहेत. अशातच अनेक सामाजिक संस्था व स्वयंसेवक मदतीसाठी समोर आले आहे. या टिक टॉक व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गरजुंना अन्न वाटप करण्यासाठी बाईकवरुन निघाला आहे. त्यावेळी त्याला रस्त्यात दोन लहान मुलं भरउन्हात चालत असताना दिसतात. तो त्यांच्याकडे जाऊन खायला मिळाल्याचं विचारतो. मात्र तो चिमुरडा खाण्यासाठी हात समोर करतो. हातावर खाण्याचा बॉक्स पडताच समोर चालणाऱ्या आईला आपल्याला खायला मिळाल्याचं ओरडून सांगतो.
सिद्धू तेलावणे नावाच्या व्यक्तीने टिकटॉकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल 17 मिलियन Views मिळाले आहेत. शिवाय 2.4 मिलियन लाइक्स आणि 44 हजार कमेंट्स आल्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रत 227 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे. यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. लॉकडाऊनमध्ये गरजुंना अन्न पुरविण्यासाठी अनेक भागातून लोक समोर येत आहे. ही देशातील एकता आहे.