• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी असं आहे मेगाब्लॉकचं वेळापत्रक!
  • VIDEO : मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी असं आहे मेगाब्लॉकचं वेळापत्रक!

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 11:54 PM IST | Updated On: Jul 27, 2019 11:54 PM IST

    मुंबई, 27 जुलै : मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक आहे. यात मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11 वाजून 20 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसईदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे इथं सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामं सुरू असतील त्यामुळे इथं सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल आणि वांद्रे, गोरेगावदरम्यानची उपनगरी रेल्वे सेवा रद्द करण्यात आलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी