• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मच्छिमारांच्या जाळ्यात लागले भल्ले मोठे मासे, क्रेन वापरावी लागली उचलायला!
  • VIDEO : मच्छिमारांच्या जाळ्यात लागले भल्ले मोठे मासे, क्रेन वापरावी लागली उचलायला!

    News18 Lokmat | Published On: Jan 10, 2019 05:58 PM IST | Updated On: Jan 10, 2019 06:03 PM IST

    रत्नागिरी,10 जानेवारी : रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील मच्छिमारांच्या जाळ्यात भली मोठे वागळी (वाटू) मासे मिळाल्याने मच्छिमारांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या माशांचं वजन तब्बल 500 ते 600 किलो इतकं असल्याने हे मासे उचलण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.जिल्ह्यातील हर्णेतील मच्छिमारांच्या जाळयात गेल्या काही दिवसांत मोठे आणि वेगळ्या प्रकारचे मासे मिळाले आहेत. या घटना ताज्या असताना आता रत्नागिरीतल्या मिरकवाडा येथील मच्छिमारांनाही याचा अनुभव आला. मच्छिमार रऊफ साखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मच्छिमारी नौकाना समुद्रात 4 भले मोठे वागळी (वाटू) मासे मिळाले. हे मासे जाळय़ातून काढताना खलाशांना मोठी कसरत करावी लागली. जवळपास 500 ते 600 किलो इतके वजन या माशांचं होतं. त्यामुळे ते उचलण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. एवढे मोठे मासे मिळल्याचे समजताच अनेकांनी मिरकरवाडा जेटीवर गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading