नवी दिल्ली, 2 जानेवारी : ज्या ऑ़़डिओ क्लिपवरून लोकसभेत 'राफेल'च्या मुद्द्यावर घमासान झालं, ती ऑडिओ टेप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन जारी केली. राफेल मुद्यावरून गदारोळ झाला असताना, माझे कोणी काहीच करू शकत नाही, सर्व फायली माझ्या बेडरुममध्ये आहेत, असा दावा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांनी केला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. पर्रिकरांच्या या गुपिताची माहिती देणाऱ्या ऑडिओ क्लिपमधला आवाज गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा असल्याचा दावा देखील काँग्रेसनं केला आहे. मात्र, त्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा नसल्याचा दावा विश्वजीत राणे यांनी केला आहे.