• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच
  • VIDEO : हजारो आदिवासी-शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच

    News18 Lokmat | Published On: Nov 21, 2018 10:08 AM IST | Updated On: Nov 21, 2018 10:15 AM IST

    21 नोव्हेंबर : शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या न्यायहक्कासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या वतीनं आज ठाणे ते विधानभवनापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चाला उलगुलान मोर्चा असं नाव देण्यात आले आहे. या मोर्चासाठी जळगाव, बुलढाणा, नंदूरबार, धुळे, नाशिक इथून हजारो मोर्चेकरी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालेत. हा मोर्चा ठाण्यातील आनंदनगर जकात नाका पोहचलाय.तिथून हा मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. विविध मागण्यांसाठी लोक संघर्ष मोर्चाचा ठाण्यातून एल्गार राज्यातले हजारो शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार रोजगारासाठी शहरात स्थलांतरीत होत आहे. हे स्थलांतर थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना केली जात नाही. शिधापत्रिका धारक आदिवासींना गहू, तांदूळ दिलं जात नाही. रोजगार हमीचं काम दिलं जात नाही. 2002 साली सरकारने दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेअंतर्गत भूमीहिनांना 3 एकर जमीन सरकारने विकत घेऊन द्यावी त्यासाठी कोट्यवधींचा निधी सरकारकडे निधी पडून आहे. 2006 साली वनजमिनाचा मालक शेतकऱ्याला करण्याचा कायदा केला. पण जळगाव, बुलढाणा जिल्ह्यातील वनदावे मंजूर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ही मागणी मान्य व्हावी यासाठी हा मोर्चा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी