S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गाढ झोपेत असताना घराबाहेर धगधगत होत्या त्यांच्या गाड्या
  • VIDEO: गाढ झोपेत असताना घराबाहेर धगधगत होत्या त्यांच्या गाड्या

    Published On: Dec 6, 2018 09:22 PM IST | Updated On: Dec 6, 2018 09:24 PM IST

    ठाणे, 6 डिसेंबर : नाशिक आणि पुण्यानंतर आता ठाण्यातही गाड्यांचं जळीतकांड सुरु झालंय. ठाण्याच्या पाचपाखाडी भागात गुरुवारी पहाटे ९ दुचाकी जाळण्यात आल्यात. पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गाढ झोपेत असलेल्यांच्या घराबाहेर त्यांच्या गाड्या धगधगत होत्या. तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला गाड्या जळताना दिसताना त्यानं तातडीनं अग्निशमन दलाला याची माहिती दिली. मात्र तोवर 9 गाड्या आगीच्या विळख्यात अडकल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत जळणाऱ्या गाड्यांशेजारच्या गाड्या वेळेत बाजूला हटवण्यात यश आलं. याप्रकरणी अज्ञातांविरोधात नौपाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close