थालंडमध्ये गुहेतून बाहेर यायचा रस्ता म्हणजे काही ठिकाणी छोटीशी फट, एवढाच होता. पण इथेच नौदलाच्या डायव्हर्सचा अनुभव कामी आला. या सर्व मुलांना थोडीशी भूल देण्यात आली होती, जेणेकरून टेंशनमुळे त्यांचं लक्ष विचलित होणार नाही, ते बिथरणार नाहीत. आणि बचावकार्यात अडथळा येणार नाही. भूल देणं शक्य झालं कारण या डायव्हर्सपैकी एक जण भूलतज्ज्ञ होता. बचावकार्य करताना गुहेतला एक व्हिडिओ थायलंड सरकारनं जारी केलाय.