S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दारूच्या नशेत तरुणाने चक्क जिवंत कोंबडी फाडून खाल्ली !
  • VIDEO : दारूच्या नशेत तरुणाने चक्क जिवंत कोंबडी फाडून खाल्ली !

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2018 08:45 PM IST | Updated On: Aug 4, 2018 08:49 PM IST

    दारूची नशा डोक्यात गेल्यावर व्यक्ती काय करेल याचा नेम नाही. तेलंगाणामध्ये एका तरुणाने दारूच्या नशेत चक्क जिवंत कोंबडीच खाल्ली..महबुबाबाद इथं हा विचित्र प्रकार घडलाय. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. काही तरुण हे दारू पिऊन मस्ती करत होते. त्यातील एका पठ्याला इतकी दारू चढली की त्याने रस्त्यावरच लोटांगण घातलं. तर दुसऱ्या एका तर्राट तरुणाने चक्क जिवंत कोंबडी खाल्ली. स्थानिक लोकांनी या तरुणांचा धिंगाणा पाहूनत्याला अडवण्याचा प्रयत्न केलाही पण पठ्याने कुणाचं ऐकलं नाही. दारूच्या नशेत त्याने कोंबडी ठार मारली त्यानंतर कोंबडीचे दोन तुकडे केले. त्या तरुणाला दारू इतकी चढली होती की तो तिथेच मित्रांसोबत झोपी गेला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस या विकृत तरुणाचा शोध घेत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close