• चहाचा घोट घेण्यापूर्वी हा Special Report जरूर बघा

    News18 Lokmat | Published On: Jan 24, 2019 11:02 PM IST | Updated On: Jan 24, 2019 11:02 PM IST

    चहा म्हटलं की तरतरी... चहाला शक्यतो कुणी नाही म्हणत नाही. बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात ही वाफाळलेल्या चहानेच होते. खरं तर चहा हा भारतीयांच्या पाहुणचाराचा एक भाग बनला आहे. पण हाच चहा तुमच्या आरोग्यासाठी धोका ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचं कारण म्हणजे भेसळ माफियांची चहावर वक्रदृष्टी पडली असून, आता बनावट चहाची बेमालुमपणे विक्री केली जातेय. नुकतेच अन्न आणि औषध प्रशासनानं मुंब्रा परिसरात छापा मारुन 1 हजार 98 किलो भेसळयुक्त चहाचा साठा जप्त केलाय. मुंब्रा येथील 'इनाम टी एजन्सी'त हा भेसळीचा काळाधंदा सुरु होता. पाहुया विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी