VIDEO: पुण्यात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने केलं विद्यार्थ्यांचं स्वागत

VIDEO: पुण्यात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने केलं विद्यार्थ्यांचं स्वागत

Symbiosis School, Pune: कोरोनंतर शाळेतर्फ पहिल्याच दिवशी झालेल्या या स्वागताने विद्यार्थी सुद्धा भारावून गेले आहेत.

  • Share this:

पुणे, 12 फेब्रुवारी: कोरोना महामारीमुळे (Covid -19) आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. याचसोबत याचा फटका शैक्षणिक क्षेत्रालाही बसला आहे. कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन घेतले जात होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे हळूहळू शाळा सुरू होऊ लागल्या आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना देखील आनंद झाला आहे. पुण्याच्या एका शाळेमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी पुण्याच्या प्रभात रोडवर असलेल्या सिंबायोसिस स्कूलमध्ये (Symbiosis School) पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु झाले. या शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी लेझीम, टाळ्या वाजवत आणि डान्स करत विद्यार्थ्याचे स्वागत केले. हा व्हिडिओ सध्या पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत असून सर्वांचे मन जिंकत आहे. तसंच सोशल मीडियावर सुद्धा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. व्हिडिओमध्ये शाळेच्या समोरील ग्राऊंडवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन विद्यार्थी रांगेत उभे राहिलेले दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहिलेले शिक्षक आणि कर्मचारी ढोल आणि लेझीमच्या तालावर डान्स करत आहेत. त्याचसोबत टाळ्या वाजत ते विद्यार्थ्यांचे स्वागत करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

हे ही वाचा-प्रायव्हेसीची चिंता सोडा; आता येतंय Android चं नेक्स्ट व्हर्जन

सिंबायोसिस सोसायटीच्या संचालिका विद्या येरवडेकर (Principal Director of Symbiosis Society, Vidya Yeravdekar) यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'कोरोनाच्या साथीने विद्यार्थ्यांना शाळांना दाडी मारायला भाग पाडले त्यामुळे ते नाराज होते.' त्यांनी पुढे असे सुद्धा सांगितले की, 'शाळा सुरु झाल्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आम्हाला हा क्षण साजरा करायचा होता.' विद्या येरवडेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

27 जानेवारीला महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government ) जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले होते की, इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करु शकतात. राज्याच्या आरोग्य विभागाने शाळा पुन्हा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यास सहमती दर्शवली आहे. या अधिसूचनेत असे सुद्धा नमूद करण्यात आले आहे की, 'कोविड-19 संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन केले गेले पाहिजे.'

 हे देखील वाचा -     वेगाचा बादशाह जेव्हा क्रिकेट खेळतो! उसेन बोल्टचा हा VIDEO पाहिलात का?

नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने 9 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली होती. पण अंतिम निर्णय जिल्हा दंडाधिकारी यांच्या हातामध्ये असेल असे सांगण्यात आले होते. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे मुंबई, पुणे आणि नाशिकमधील शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या. फक्त ग्रामीण भागातील शाळा सुरु होत्या. अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील जवळपास 78.47 लाख विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवीच्या वर्गात उपस्थिती लावली.

link - https://www.news18.com/news/buzz/watch-teacher-staff-welcome-students-back-to-school-with-dance-performance-in-pune-3423809.html

Published by: news18 desk
First published: February 12, 2021, 10:52 PM IST

ताज्या बातम्या