पुणे, 31 ऑगस्ट : खासदार सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाटातील रस्त्याची दुरवस्था समोर आणण्यासाठी सेल्फी विथ खड्डा अभियानाअंतर्गत सेल्फी घेतला. बोपदेव घाटात नोव्हेंबर 2017 मध्ये या अभियानाची त्यांनी सुरुवात केली होती. पुणे शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांनी खड्ड्यांबरोबर सेल्फी घेऊन राज्य सरकारला जाब विचारला. याविषयी त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांनी