भोपाळ, 30 एप्रिल : लोकसभा माजी अध्यक्षा सुमित्रा महाजनांनी आज साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची भेट घेतली. साध्वींना भाजपनं भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह अभाविपमध्ये असल्यापासून मी त्यांना ओळखते, आमचे संबंध चांगले आहेत. त्यांना मी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या, असं महाजन यांनी भेटीनंतर सांगितलं.