चंद्रपूर, 22 डिसेंबर : येत्या निवडणुकीत राज्यात सेना आणि भाजप यांच्यात युती होईल असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यदा कदाचित ही युती झाली नाही, तरीही लोकसभेत भाजपलाच सर्वाधीक जागा मिळतील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सेना-भाजप युती कांग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला पराभवाची धुळ नक्कीच चारेल असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. राज्यातली लोकसभा निवडणुकीच्या युतीसह विधानसभा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची भुमिका आणि भाजपने केलेलं अंतर्गत सर्वैक्षण यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचं मत स्पष्ट केलं. चंद्रपुरात न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.