• होम
  • व्हिडिओ
  • इंदू मिल स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचा Exclusive VIDEO
  • इंदू मिल स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचा Exclusive VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jan 23, 2019 09:30 PM IST | Updated On: Jan 23, 2019 09:47 PM IST

    प्रशांत लिला रामदास, नवी दिल्ली, 23 जानेवारी : मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची एक्सक्लुझिव्ह दृष्ये फक्त न्यूज18 लोकमतवर आम्ही दाखवणार आहेत. लोकसभा निवडणुकीआधी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम युद्ध गतीनं सुरू आहे. त्यासाठी नोएडा येथील ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेत बाबासाहेबांचा पुतळा तयार करण्यात येत आहे. 107 मीटर उंचीचा हा पुतळा तयार केला जात असून त्याची 25 फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. पुतळा निर्मितीच्या कामाची आज सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी केली. पुढील 20 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर आणि स्मारक समितीतील सदस्य या पुतळ्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर लवकरतात लवकर स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं बडोले यांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी