धुळे, 12 फेब्रुवारी : जिल्ह्यातील पिंपळनेर नाशिक महामार्गावर एक विचित्र अपघात थोडक्यात टळलाय. एसटी चालकाच्या प्रसंगावधामुळे टोल नाक्यावर भीषण अपघात होता-होता वाचला. नाशिकहून पिंपळनेरकडे जाणारी एसटी बस पिंपळनेर टोल नाक्याजवळ येताच अचानक ब्रेक फेल झाले. यावेळी बसच्यापुढे असलेल्या एका कारला वाचविण्यासाठी एसटी बस चालकाने बस फुटपाथवर चढवून पुढे नेली. या प्रसंगावधानमुळे एसटी बस आणि कार मध्ये होणारा मोठा भीषण अपघात होताना टळला. आणि एसटी बसमधल्या प्रवाशांचा जीव वाचला. हा सगळा थरार CCTV कॅमेरात कैद झाला आहे.