मुंबई, 14 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 51वा वाढदिवस राज्यात जल्लोषात साजरा केला जात आहे. सत्ता असो किंवा नसो राज ठाकरेंची लोकप्रिय कायम आहे. जबरदस्त वक्तृत्व आणि धारदार व्यंगचित्र ही राज ठाकरेंची खास आयूधं आहेत. मात्र ,मनसेला उभारी देण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर निर्माण झालं आहे.