प्रदीप भणगे, 16 मे : डोंबिवलीजवळच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळची शेत जरी हिरवं दिसत असलं तरी या शेताला पाणी मात्र काळ्या घाणेरड्या नाल्यातून आणि गटारातून मिळते. १५ ते २० एकर परिसरात ही घातक केमिकल मिश्रित पाण्याची शेती सुरू आहे. इथं पिकवलेले पालक, लाल माठ, मुळा, मेथी, भेंडीची भाजी मुंबई ठाण्यात विकली जाते. आरोग्यदायी म्हणून तुम्ही या भाज्या तुम्ही खाता. मात्र, त्याच तुमच्या जीवावर बेतू शकतात.