SPECIAL REPORT : अवघ्या 6 महिन्यात उर्मिला मातोंडकरांना का सोडावा लागला काँग्रेसचा 'हात'?

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उर्मिला मातोंडकरांनी भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात निवडणुक लढवली होती.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 08:43 PM IST

SPECIAL REPORT : अवघ्या 6 महिन्यात उर्मिला मातोंडकरांना का सोडावा लागला काँग्रेसचा 'हात'?

सागर कुलकर्णी, मुंबई, 10 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर काँग्रेसचा 'हात' सोडला आहे. काँग्रेसकडून त्यांनी राजकीय कारकिर्दला सुरुवात केली होती. परंतु, अवघ्या 6 महिन्यात त्यांना राजकारणातून बाहेर पडावं लागलं.

काँग्रेसला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाही. एकापाठोपाठ एक नेते पक्ष सोडून जात असतानाचं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही काँग्रेसचा हात सोडला. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गतवादाला कंटाळून त्यांनी पक्षाला रामराम केला.

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उर्मिला मातोंडकरांनी भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी पक्षाविरोधात काम केल्याची तक्रार उर्मिलांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरांकडं केली होती. मात्र पक्षानं त्या तक्रारीवर कोणतीच कारवाई न केल्यामुळं उर्मिलांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरांना 16 मे रोजी पाठवलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या पत्रातील गोपनीय माहिती सोयीस्करपणे प्रसारमाध्यमांना पुरवण्यात आली. या पत्रात ज्यांची नावं होती त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. असा ठपका उर्मिला मातोंडकरांनी ठेवलाय.

मिलिंद देवरा गटानं उर्मिला मातोंडकरांचं ते पत्र फोडल्याचं बोललं जातं आहे. खरं तर उर्मिलांनी संजय निरुपमांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसंच निरुपमांच्या प्रयत्नांमुळेच त्यांना लोकसभेची उमेदवारीही मिळाल्याचं सांगितलं जातं. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उर्मिला मातोंडकरांनी राजीनामा दिल्यामुळं मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

Loading...

==========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2019 08:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...