• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : बिर्याणीत अळ्या देणाऱ्या 'एसपीज्'च्या मालकाची ग्राहकावरच अरेरावी, दिली 'ही' धमकी
  • SPECIAL REPORT : बिर्याणीत अळ्या देणाऱ्या 'एसपीज्'च्या मालकाची ग्राहकावरच अरेरावी, दिली 'ही' धमकी

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 09:04 PM IST | Updated On: Jun 2, 2019 09:05 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 02 जून : पुण्यातील प्रसिद्ध एसपीज् बिर्याणी हाऊसमध्ये आज बिर्याणीत अळी सापडली. तक्रारदार वीरेंद्र ठाकूर आपल्या लहान मुलाबरोबर जेवायला गेले होते. तेव्हा त्यांच्या बिर्याणीत मोठी अळी सापडली. याहून धक्कादायक म्हणजे आम्ही जेव्हा एसपीज् चे मालक जवाहर चोरगे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी थेट ग्राहकावरच वाटेल तसे आरोप करायला सुरुवात केली. 'बिल भरायचं नाही म्हणून काही लोक खिशात अळ्या घेऊन येतात आणि बिर्याणीत टाकतात, जर चिकन आणि मटण इतकं शिजलं, तर अळी कशी शिजली नाही', अशी अजब उत्तरं चोरगे देत होते. कहर म्हणजे पीडित ग्राहकावरच त्यांनी गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी