मुंबई, 06 जून : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांचं मंत्रीपद धोक्यत आलं आहे. मुंबईतील ताडदेव येथील एम.पी.मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता दोषी असल्याचा ठपका लोकायुक्तांनी ठेवला. धक्कादायक बाब म्हणजे, प्रकल्पाला मंजुरी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहतांनी फाईलवर मारला होता. मात्र, मेहतांनी मुख्यमंत्र्यांना अवगतच केलं नसल्याचं चौकशीत समोर आलं आहे.