असिफ मुरसल,सांगली, 01 मे : उन्हाळ्यात बाटली बंद पाण्याची मागणी वाढते. त्यामुळं या काळात अनेक कंपन्या बाटली बंद पाण्याची विक्री करतात. मात्र, सांगली जिल्ह्यात अनेक कंपन्या अनधिकृतपणे बाटली बंद पाण्याची विक्री करीत आहेत. वीस लिटर पाण्याची बाटली 35 ते 40 रुपयांना विकली जात असून या अनधिकृत कंपन्यांकडून जनतेच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं चित्र आहे.