मुंबई, 07 जुलै : इथून पुढे तुम्ही नो पार्किंग झोनमध्ये कार पार्क केलीत तर तुम्हाला 100-200 नाहीतर तब्बल 10 हजारांचा दंड होऊ शकतो. विशेष म्हणजे आजपासून मुंबई महापालिका आणि मुंबई वाहतूक पोलिसांची धडक मोहीम सुरू होणार आहे. नो पार्किंग झोनमध्ये अवैध पार्किंग केल्यास थेट 10 हजारांची पावती फा़डली जाणार आहे.