• SPECIAL REPORT : इंजिनिअर असलेले पुणेकर गांधीवादी!

    News18 Lokmat | Published On: Jan 30, 2019 10:28 PM IST | Updated On: Jan 30, 2019 11:01 PM IST

    अद्वैत मेहता, 30 जानेवारी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 71 व्या पुण्यतिथीनिमित्त आणि दिडशेव्या जयंतीच्या औचित्याने पुणेकरांना आवर्जुन आठवतात एक पुणेकर. मॅकेनिकल इंजिनिअर असलेले माधव सहस्त्रबुद्धे गेली अनेक वर्ष गांधिजींचे स्वावलंबनाचे धडे अविरतपणे गिरवत आहेत. आपल्या जवळचं ज्ञान, कौशल्य, माहितीचा वापर स्वावलंबनासाठी करा....या गांधीजींच्या शिकवणीचा गेली 10 वर्ष पुरस्कार करणारे हे माधव सहस्त्रबुद्धे..माधव सहस्त्रबुद्धे हे मॅकेनिकल इंजिनिअर असून ते मुळचे बंगळुरूचे पण सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. गेली 10 वर्ष ते पेटी चरख्यावर सूत कताई करतात. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी लागणारं वस्त्र ते स्वतःच चरख्यावर विणतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी