बशीर जमादार, मुंबई, 13 मे : नेता बनलेला आघाडीचा अभिनेता कमल हासन यांनी गांधीहत्येबद्दल वक्तव्य करून ऐन निवडणुकीत हिंदू दहशतवादाच्या राजकारणाला हवा दिली. तामिळनाडूत प्रचारसभेत बोलताना त्यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असं सांगत वादाची ठिणगी टाकून दिली. मुस्लीमबहुल भागात आणि गांधीजींच्या पुतळ्याच्या समक्ष त्यांनी हे विधान केलं आहे.