हर्षल महाजन, नागपूर, 14 ऑगस्ट : कॉलेज तरुणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्याला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी धमकी देण्यासाठी व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर करीत असल्यामुळं त्याचा छडा लावणं कठीण होतं. मात्र नागपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्याला जेरबंद केलं आहे.