12 मार्च : मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज थेट विरोधी पक्षनेत्याच्या मुलालाच भाजपाच्या कळपात खेचून काँग्रेस आघाडीला मोठा धक्का दिला. किंबहुना त्यांचा हा मास्टरस्ट्रोकच म्हणावा लागेल. फक्त सुजयच नाहीतर माहिते पाटलांचा रणजीतही भाजपच्या गळाला लागण्याची चिन्ह आहेत. कारण, रणजीत सिंहने गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्र्यांचे हनुमान असलेल्या गिरीश महाजनांची तब्बल दोनदा भेट घेतली.