मुंबई, 13 जून : परग्रहावरून एलियन्स पृथ्वीवर आले आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. पण खरा धक्का तर पुढेच आहे. परग्रहावरून आलेला एलियन्स सीसीटीव्हीतही कैद झाला आहे.
एलियन्स पाहिल्याचा दावा अनेकदा केला जातो. आकाशातून एलियन्स येत असल्याचे व्हिडिओही पाहायला मिळतात. आकाशातून तीन-तीन प्रकाशमान उडत्या तबकड्या पृथ्वीकडे वेगाने येतात. ज्या तबकड्यांमधून एलियन्स येत असतात असं बोललं जातं. पण एलियन्स नंतर कुठे जातात हे कळत नव्हतं.
पण आता एक असा व्हिडिओ समोर आलाय, की ज्यात पृथ्वीवर आलेला एलियन्स स्पष्टपणे दिसत आहे. या सीसीटीव्हीत घराच्या बाजूला एक कार पार्क केलेली दिसते. त्याचवेळी एक सावली पुढे येताना पाहायला मिळते. नंतर ती सावली एलियन्सची असल्याचं लक्षात येतं.
नाचताना जसे हात हलवले जातात त्या प्रमाणे एलियन्स हात हलवत पुढे जातो. वाकडी तिकडी पावलं टाकत जाणारा एलियन्स लगेच गायब होतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तीन कोटींपेक्षा जास्त वेळा पाहण्यात आला.
अमेरिकेतल्या कोलोराडोतली रहिवासी विवियन गोमेजनं त्यांच्या सीसीटीव्हीत कैद झालेला हा एलियन सोशल मीडियावर शेअर केला.
एलियन सोशल मीडियावर हिट आहे. तशीच बॉलिवूडमध्येही एलियन्सची जादू नेहमीच चालते, हे आपण पाहिलेलं आहे.
====================